Partners

१. ज्ञानेश्वर रेवगडे

पाडळी, टा-सिन्नर, जि.नाशिक

हा ३१ वर्षांचा तरुण शेतकरी असून पद्मश्री सुभाष पालेकर यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून गेली ५ वर्ष सातत्याने नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला व फळे पिकवत आहे. मिश्रपिके, नैसर्गिक निविष्ठा व पाळेकर तंत्राचा वापर करीत स्वतःची 3 एकर यशस्वी शेती करत आहे. त्याचबरोबर परिसरातील २५ शेतकऱ्यांचा गट बनवून त्यांना या तंत्रानुसार शेती करण्यास व हमखास उत्पन्नाची हमी देऊन त्यानाही सोबत घेऊन काम करत आहे. आपणास मिळणाऱ्या नैसर्गिक भाज्या, फळे व इतर विदेशी सलाड भाज्या यांच्याकडूनच उपलब्ध होत आहे.

२. कळसुबाई मिलेट उत्पादक शेतकरी संस्था (FPO)

अकोले, ता – अकोले, जि. अहमदनगर

हो संस्था मिलेट (भरडधान्य) व पारंपरिक पिकांच्या संवर्धानासाठी शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. पारंपरिक बियाणांचा वापर, नैसर्गिक शेतीपद्धती, योग्य बाजारभावाची हमी, आरोग्यदायी मूल्यवर्धित खाद्यपदार्थ व स्थानिक आदिवासी महिलां व शेतकरी यांना शाश्वत उपजीविका या पंचसूत्री तत्वावर काम करत आहे. या संस्थेचे २५० नोंदणीकृत लघु आदिवासी शेतकरी सदस्य असून यात ९० % सदस्य या महिला आहेत. एकूण ९ प्रकारची भरडधान्य, देशी तांदूळ व जंगली फळे यापासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ आपणास उपलब्ध करून देत आहे.

१. ज्ञानेश्वर रेवगडे

पाडळी, टा-सिन्नर, जि.नाशिक

हा ३१ वर्षांचा तरुण शेतकरी असून पद्मश्री सुभाष पालेकर यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून गेली ५ वर्ष सातत्याने नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला व फळे पिकवत आहे. मिश्रपिके, नैसर्गिक निविष्ठा व पाळेकर तंत्राचा वापर करीत स्वतःची 3 एकर यशस्वी शेती करत आहे. त्याचबरोबर परिसरातील २५ शेतकऱ्यांचा गट बनवून त्यांना या तंत्रानुसार शेती करण्यास व हमखास उत्पन्नाची हमी देऊन त्यानाही सोबत घेऊन काम करत आहे. आपणास मिळणाऱ्या नैसर्गिक भाज्या, फळे व इतर विदेशी सलाड भाज्या यांच्याकडूनच उपलब्ध होत आहे.

२. हितेश पटेल

मुंगसरे, जि. नाशिक

हे नाशिक शहरातील प्रतिष्टीत व्यापारी आहे, कुटुंबातील जवळचे सदस्य कर्करोगासारख्या असाध्य आजारामुळे गमवावे लागल्याने विषमुक्त अन्नाच्या चळवळीशी जोडले गेले. सध्या मुंगसरे येथील शेतात पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या पंचस्तरीय मिश्रपिक तंत्रानुसार द्राक्षशेती करत आहे. यामध्ये द्राक्षलागवडीची पारंपरिक पद्धतीने बिया असणाऱ्या द्राक्षांच्या १० पारंपरिक जातीचे संवर्धन ते करत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते विक्रीव्यवस्था उभी करून शेतकऱ्यासोबत आहेत.

३. ओम देशमुख

कृषीनगर, नाशिक

हे उच्चशिक्षित इंजिनिअर असून ‘एका काडातून क्रांती’ या मासानोबू फुकुओका यांच्या नैसर्गिक शेतीपद्धतीने प्रभावित होऊन स्वतःच्या शेतात १९९९ पासून नैसर्गिक पद्ध्तीने विविध पिके घेत आहेत. गेली १० वर्ष सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करत ते अनेक शेतकरी संस्था, संघटना यांच्यासोबत काम करत आहे. नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार, प्रशिक्षण व शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

४. सुभाष जाधव

सिडको, नाशिक

ते एक शेतकरी व योग प्रशिक्षक असून, आदरणीय सुभाष पाळेकार सर यांच्या शिबिरातून प्रेरणा घेऊन त्या पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. गेले ८ वर्ष पाळेकर सरांच्या चळवळीसह जोडून काम करत आहे. रासायनिक निविष्ठामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, अनेक आजार जडतात, हे सर्व टाळावयाचे असेल तर ग्राहकांना विषमुक्त अन्न उपलब्ध व्हावयास हवे, असे त्यांना ठामपणे वाटते. त्यासोबतच ग्राहकांना निरामय आयुष्य भेटावे म्हणून योगासनांचे प्रक्शिक्षण ते येथे देत आहेत.

५. कुशल पोकार

पाडळी, टा-सिन्नर, जि.नाशिक

कुशल हा या टीममधला अत्यंत तरुण मित्र वडिलांच्या प्रोत्साहनामुळे येथे कार्यरत आहे. तरुण पिढीला विषमुक्त व पारंपरिक अन्नाची आवड तयार व्हावी यासाठी तो प्रयत्नशील आहे.